अयोध्येतील सोहळ्याच्या लाईव्ह प्रक्षेपणाचा यूट्यूबवर नवा विक्रम

अयोध्या

अयोध्येत काल राम मंदिराच्या उद्घाटनाचा ऐतिहासिक सोहळा पार पडला. या सोहळ्याला अभिनय, संगीत, उद्योग, क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी हजेरी लावली. ज्यांना या सोहळ्याला जाता आले नाही, त्यांनी यूट्यूबवर हा सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण पाहिले. तब्बल १ कोटी ९० लाख लोकांनी काल हा ऐतिहासिक सोहळा यूट्यूबवर पाहिला. त्यामुळे या सोहळ्याने यूट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपणाचा नवा विक्रम प्रस्थापित केला.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवरुन या सोहळ्याचे २ व्हिडिओ ब्रॉडकास्ट करण्यात आले होते. यातील एक व्हिडिओ एक कोटी लोकांनी लाईव्ह पाहिला, तर दुसऱ्या व्हिडिओ ९० लाख लोकांनी लाईव्ह पाहिला. यामुळे यूट्यूबवर नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. यूट्यूबवर सर्वाधिक पाहिलेल्या लाईव्ह प्रक्षेणाच्या व्हिडिओंमध्ये पहिल्या क्रमांकावर प्रभू रामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चांद्रयान-३ च्या लँडिगचा व्हिडीओ आहे. चांद्रयान-३ चे लाईव्ह प्रक्षेपण ८० लाख ९० हजार लोकांनी पाहिले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top