अयोध्येत दुधाच्या कॅनने रांगोळी रेखाटतोय महाराष्ट्रीय कलाकार

अयोध्या- अयोध्येत सध्या सणा-सुदीच्या दिवसांसारखी धामधूम सुरू आहे. सर्वत्र रंगरंगोटी केली जात आहे. रोषणाई केली जात आहे.अशा राममय वातावरणात महाराष्ट्रातून अयोध्येला पोहोचलेला एक कलाकार लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. कारण रांगोळी रेखाटण्यासाठी तो चक्क दुधाच्या मोठ्या कॅनचा वापर करीत आहे. या कॅनच्या खालच्या बाजूस छिद्रे पाडलेली आहे. अयोध्येतील लता मंगेशकर चौकात कॅनमध्ये रांगोळी भरून रस्त्यावर सुंदर रांगोळी रेखाटतानाचा त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
या कलाकाराने अयोध्येच्या मार्गातील २५ शहरांमध्ये आतापर्यंत रांगोळी रेखाटली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top