अयोध्येत साधूची हत्या! मंदिराच्या आत मृतदेह

लखनौ – अयोध्या येथील प्रसिद्ध हनुमानगढी मंदिरातील राम सहारे नावाच्या साधूची गळा चिरून हत्या करण्यात आली. राम सहारे हे हनुमानगढी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या खोलीत रहात होते. या खोलीत काल सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. त्याच्या मानेवर खोलवर जखमा आढळल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस मंदिरात पोहोचले आणि त्यांनी तपास सुरू केला. आंबेडकर नगरच्या भिटी येथील सुमारे १० एकर भूमीच्या मालकीवरून ही हत्या झाल्याचे म्हटले जात आहे. राम सहारे हे हनुमानगढीच्या बसंतीया पट्टीचे संत दुर्बल दास यांचे शिष्य होते.
राम सहारे यांची हत्या झाली, तेव्हा मंदिराच्या आवारातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. हत्या झाल्यापासून मंदिर परिसरात रहाणारा ऋषभ शुक्ला नावाचा तरुण बेपत्ता आहे. त्याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात आहे. हनुमानगढी मंदिरात काही दिवसांपूर्वीच एका नागा साधूचा संशयास्पद मृत्यू झाला होता. ते प्रकरण आत्महत्येचे असल्याचे बोलले जात होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top