अयोध्येनंतर अबुधाबीतही हिंदू मंदिरमोदींच्या हस्ते १४ फेब्रुवारीला उद्घाटन

दुबई – येत्या २२ जानेवारी रोजी जगाच्या नजरा अयोध्येकडे असतील. पण आणखी एका मुस्लीम देशात हिंदू मंदिर बांधले जात आहे. या मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.भारताचे मित्र राष्ट्र संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये या भव्य राम मंदिराची तयारी जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ फेब्रुवारी रोजी अबुधाबी येथे या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन करणार आहेत.

अबुधाबीमध्ये पहिले हिंदू मंदिर बांधणाऱ्या बीएपीएस स्वामीनारायण या संस्थेने या मंदिराच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदींना आमंत्रित केले आहे.त्यांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे. हे मंदिर उद्घाटनानंतर लगेच भाविकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. हे मंदिर २० हजार चौरस मीटर जागेवर बांधले गेले आहे. मंदिराची रचना आधुनिक शैलीत आहे.प्राचीन आणि पाश्चात्य स्थापत्यकलेचा मिलाफ करून हे मंदिर बांधण्यात येत आहे. यावर कोरीव काम देखील केलेले आहे.भव्य मंदिराची जोरदार तयारी सुरू आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१८ मध्ये या मंदिराची पायाभरणी केली होती. त्यामुळे अयोध्येत तर तयारी सुरु आहेच.पण अबुधाबीमध्ये देखील हे मंदिर दर्शनासाठी खुले होणार असल्याने उत्साहाचे वातावरण आहे.अयोध्येत होत असलेल्या कार्यक्रमात ५५ देशांमध्ये राहणाऱ्या अनिवासी भारतीयांना जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.भारतच नाही तर अमेरिका आणि इतर देशांमध्ये राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये ही उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top