अयोध्येला जाण्यासाठी केवळ १६२२ रुपयांत विमानाचे तिकीट

स्पाईसजेट एअरलाईनची घोषणा

चंदीगड

स्पाईसजेट या विमान कंपनीने अयोध्येला जाणाऱ्या भाविकांना एक खास ऑफर दिली आहे. ही कंपनी फक्त १६२२ रुपयांत अयोध्येला घेऊन जाणार आहे. कंपनीच्या या ऑफर अंतर्गत तिकिटांची विक्री २२ जानेवारीपासून २८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. प्रवासाचा कालावधी २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर असा ठेवण्यात आला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या ऑफरअंतर्गत प्रवाशांना २८ जानेवारीपर्यंत तिकीट बुक करता येणार आहे. ही ऑफर २२ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०२४ पर्यंतच्या प्रवासासाठी नॉन स्टॉप देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर वैध आहे. या ऑफर अंतर्गत, प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. यामध्ये मर्यादित जागा उपलब्ध आहेत. फ्री डेट चेंज ऑफरसह तुम्ही प्रवासाची तारीख सहजपणे बदलू शकता. परंतु यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे.

स्पाईसजेट कंपनी १ फेब्रुवारी २०२४ पासून अयोध्येला इतर अनेक शहरांशी जोडणार आहे. चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, मुंबई, बेंगळुरू, जयपूर, पाटणा आणि दरभंगा येथून अयोध्येसाठी उड्डाणे सुरू केली जाणार आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top