अरविंद केजरीवल यांना जामिनानंतर पुन्हा समन्स

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ईडीने नववे समन्स बजावले आहे. काल न्यायालयाने केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर केला. त्यानंतर आज ईडीने केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. त्यांना २१ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने केजरीवालांना ८ समन्स बजावली होती. ईडीने २ नोव्हेंबर २०२३ रोजी केजरीवाल यांना पहिले समन्स पाठवले होते. यानंतर, त्यांना २१ नोव्हेंबर, ३ जानेवारी, १८ जानेवारी, २ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी, २६ फेब्रुवारी आणि ४ मार्च रोजी आठवे समन्स पाठवले. मात्र केजरीवाल एकदाही चौकशीसाठी हजर झाले नव्हते. ८ समन्सनंतर केजरीवाल यांनी ईडीला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. केजरीवाल ईडी चौकशीला हजर राहत नाही, असे सांगत ईडीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीवेळी केजरीवाल यांना दंडाधिकारी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा देत १५ हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला. या जामीनानंतर ईडीने आज पुन्हा केजरीवाल यांना समन्स बजावले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top