अरुण गवळीची दिवाळी घरात चार आठवड्यांचा पॅरोल मंजूर

मुंबई – घाटकोपरमधील मोहिली व्हिलेजचे शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झालेल्या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि अन्य आरोपींना चार आठवड्यांच्या पॅरोलवर सोडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नागपूर तुरुंग
प्रशासनाला दिले आहेत.
त्यामुळे अरुण गवळी यंदाची दिवाळी घरीच साजरी करण्याची शक्यता आहे.

जामसंडेकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत असलेल्या अरुण गवळीसह अन्य आरोपींनी पॅरोलसाठी सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता.त्यावर काल गुरुवारी सुनावणी झाली.त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या पॅरोल रजा मागणीला मंजुरी दिली. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर खून प्रकरणी कुख्यात गुंड अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. २ मार्च २००७ रोजी घाटकोपरच्या असल्फा भागात कमलाकर जामसंडेकर यांची घरात घुसून गोळीबार करत हत्या करण्यात आली होती. त्यासाठी अरुण गवळीने ३० लाख रुपयांची सुपारी दिली होती.गवळीवर खंडणीचाही गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भातील खटला मोक्का न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे.पोलिसांनी जामसंडेकर
हत्येप्रकरणी २००८ मध्ये अरुण गवळीला अटक केली.यानंतर २०१२ मध्ये विशेष न्यायालयाने अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.तेव्हापासुन तो तुरुंगात आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top