Home / News / अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही! गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर

अर्थ खात्यासारखे नालायक खाते नाही! गुलाबराव पाटलांकडून घरचा आहेर

जळगाव -अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह शेरा मारून यायची. मात्र पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले.अशा शब्दात...

By: E-Paper Navakal

जळगाव -अर्थ खात्यासारखे नालायक खाते पाहिले नाही, दहा वेळा फाईल निगेटिव्ह शेरा मारून यायची. मात्र पाठपुराव्यामुळे आमचे काम झाले.अशा शब्दात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
हात पंप आणि वीज पंप दुरुस्ती आणि देखभाल कर्मचारी संघटनेच्या वतीने आज जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्ताने जाहीर सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.ते पुढे म्हणाले, तुम्ही आज माझ्या सत्कार सन्मानसाठी जी शाल दिली. तिची ऊब मी कधीही विसरू शकणार नाही. तुमची शाल मला कोणत्याच विरोधकांची थंडी वाजू देणार नाही. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मी पाणी पुरवठा खाते मागितले नव्हते. कॅबिनेटमध्ये वर्णी लागत असल्याने मी समाधानी होतो.

Web Title:
संबंधित बातम्या