अवकाशातून राम मंदिराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

हैदराबाद –
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राम मंदिर, श्रीरामाची मूर्ती आणि अयोध्येतील सजावटीचे विविध फोटो व्हायरल झाले आहेत.आता सोशल मीडियावर अंतराळातून काढलेला अयोध्येतील राम मंदिराचा फोटो व्हायरल झाला आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अयोध्येतील राम मंदिराचा सॅटेलाइट फोटो शेअर केले आहेत. भाविकांना राम मंदिर सॅटेलाइट फोटो पाहण्यासाठी गूगल मॅपचा वापर करावा लागणार आहे, तर सॅटेलाइट फोटोमध्ये राम मंदिर स्पष्ट दिसून येत आहे. सॅटेलाइट फोटोंमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदीही स्पष्टपणे दिसत आहे. सॅटेलाइट फोटोमध्ये नूतनीकरण केलेले अयोध्या रेल्वे स्थानकही दिसत आहे. भारताचे सध्या 50 हून अधिक उपग्रह अवकाशात असून हैदराबाद येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्राने अयोध्येतील श्री राम मंदिराचे छायाचित्र टिपण्याचे काम केले आहे, असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top