अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रतापराव चिखलीकर यांचा दावा

नांदेड- काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये लवकरच प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत, असा खळबळजनक दावा नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे. अशोक चव्हाण हे भाजपामध्ये येण्यास इच्छुक असल्याचे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची माहिती चिखलीकर यांनी दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
बावनकुळे गुरुवारी नांदेड दौऱ्यावर होते. त्यांनी मुखेड आणि नांदेड शहरात १०० सुपर वॉरियर्सची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी अशोक चव्हाण भाजपमध्ये येण्यास इच्छुक असल्याचे कार्यकर्त्यांसमोर सांगितल्याचे चिखलीकर म्हणाले. भाजपचा दुपट्टा घेण्यासाठी अनेक लोक रांगेत आहेत. त्यांनी काही काँग्रेस नेत्यांचा उल्लेख केला. मागच्या सरकारने अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याला १५० कोटी रुपयांचे थकहमी दिली नाही, पण ते जेव्हा भाजपाच्या नेत्यांकडे तेव्हा महायुती सरकारने त्यांच्या कारखान्याला थकहमी दिली. यावरून लक्षात घेतले पाहिजे. अशोक चव्हाण सत्तेसाठी भाजपमध्ये येऊ शकतात. आम्ही त्यांचे स्वागत करू, असेही चिखलीकर म्हणाले.
दरम्यान, चिखलीकर यांच्या या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सूचक विधान केले आहे. ते म्हणाले की, आम्ही कुणाकडे जात नाही, पक्ष फोडायला जात नाही. पण कुणी भाजपचा दुपट्टा घालणार असेल तर त्याचे स्वागतच आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top