Home / News / असा निकाल कसा असून शकतो? आकडेवारी देत शरद पवारांची टीका

असा निकाल कसा असून शकतो? आकडेवारी देत शरद पवारांची टीका

कोल्हापूर – एकीकडे महायुती सरकार स्थापन झाले आहे पण अजूनही विरोधकांकडून मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. आज शरदचंद्र...

By: E-Paper Navakal

कोल्हापूर – एकीकडे महायुती सरकार स्थापन झाले आहे पण अजूनही विरोधकांकडून मतदान प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात आहे. आज शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आकडेवारी सादर असा निकाल कसा असून शकतो, असा संशय व्यक्त केला आहे. अजित पवार गटाला कमी मतदान असूनही जास्त उमेदवार जिंकले आहेत. तिथे पवार गटाला जास्त मतदान आहे, पण दहाच उमेदवार निवडून आले आहे, हे आकडे आश्चर्यकारक आहे.

शरद पवार कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट, पवार गट आणि आपल्या पक्षाला किती मते मिळाली, याची आकडेवारीच वाचून दाखवली.शरद पवार म्हणाले की, आज महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहत आहोत, एक उत्साहाचे वातावरण असते. मला महाराष्ट्रात असे वातावरण दिसत नाही. मतांची आकडेवारी बघितली तर आश्चर्य वाटत आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात ८० लाख मते असून त्यांचे १५ उमेदवार विजयी झाली आहे. तर शिंदे गटाला ७९ लाख मते मिळाली. काँग्रेसपेक्षा एक लाख कमी मते मिळाली. पण त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. म्हणजे जिथे काँग्रेसला ८० लाख मतदान असूनही १५ उमेदवार आणि ज्यांचे ७९ लाख मतदान आहे त्यांचे ५७ उमेदवार निवडून आले आहेत. शरद पवार गटाला ७२ लाख मते आहेत. आमचे १० उमेदवार निवडून आले . अजित पवार गटाला ५८ लाख मते मिळाली आहेत, त्यांचे ४१ उमेदवार विजयी झाले आहेत. हा मोठा फरक आहे. आम्ही काही खोलात गेलो नाही. प्रत्येक पक्षाला किती मते मिळाली, याबद्दल अधिकृत माहिती मिळत नाही, तोपर्यंत भाष्य करणार नाही.पण मतांचे आकडे हे आश्चर्यकारक आहेत.

Web Title:
संबंधित बातम्या