आंगणेवाडी तारखेच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये

आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाचे आवाहन

सिंधुदुर्ग

मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीच्या यात्रेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर यात्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आंगणेवाडी तारखेच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका. यात्रेची तारीख निश्चित होताच मंडळाच्या वतीने जाहीर करण्यात येईल, असे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने स्पष्ट केले आहे.

नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रध्दास्थान म्हणून मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडीकडे पाहिले जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही देवीच्या यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी लाखो भाविक मुंबईहून मालवणमध्ये जातात. परंतु यात्रेची तारीख जाहीर होण्यापूर्वीच अनेक अफवा पसरवल्या जातात. यंदाही १५ फेब्रुवारी रोजी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरत आहेत. त्यामुळे या तारखांवर विश्वास ठेऊ नये. अशा अफवा कोणीही पसरवू नये ,असे आवाहन आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाने केले आहे. देवालयात व देवालयाबाहेर विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. प्रथेप्रमाणे या कार्यक्रमानंतर यात्रेची तारीख निश्चित होईल व ती प्रसिद्ध केली जाईल, असे मंडळाने स्पष्ट केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top