आजपासून सोनुर्ली गावात माऊली पुनःप्रतिष्ठापना सोहळा

सावंतवाडी – लोटांगणाच्या जत्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनुर्ली गावातील श्री देवी माऊलीचा पुनःप्रतिष्ठापना सोहळा उद्या सोमवार २९ एप्रिलपासून सुरू होत आहे. हा सोहळा
१ मेपर्यंत म्हणजे तीन दिवस चालणार आहे.

या पुनःप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्रमुख मानकरी राजेंद्र गावकर आणि सुरेश गावकर यांनी दिली. याबाबत काल मंदिरात सोनुर्ली, मळगाव येथील ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. यावेळी देवाला कौल लावण्यात आला. यानंतर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे युवा कार्यकर्ते राज सोनुर्लेकर यांनी सांगितले.गावातील श्री देवी माऊलीचे मंदिर नव्याने बांधण्यात आले आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top