आज जगाची लोकसंख्या ८०० कोटींवर पोहचली !

नवी दिल्ली- आज वर्षातील शेवटचा दिवस असून उद्या १ जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होत आहे.या नववर्षाच्या मध्यरात्री जगाची लोकसंख्या ८०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.उद्या १ जानेवारी रोजी जागतिक लोकसंख्या ८,०१९, ८७६,१८९ इतकी झालेली असेल.गेल्या वर्षभरात ७.५ कोटींनी लोकसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे .

अमेरिकेतील लोकसंख्या ब्युरोच्या अहवालानुसार जाहीर करण्यात आलेली ही जागतिक लोकसंख्येची आकडेवारी आहे.गेल्या वर्षभरात लोकसंख्येचा घड्याळ दर सेकंदाला ४.३ जन्म आणि २ मृत्यू असा स्थिर स्वरूपातील आहे. मात्र जागतिक विकास दर १ टक्क्यांनी कमी झाला आहे. नोव्हेंबर २०१२ जगाची लोकसंख्या ७०० कोटी होती.म्हणजेच त्यात १०० कोटींची भर पडायला ११ वर्षे लागली आहेत. कोरोनाच्या साथीमुळे लोकसंख्येवर मोठा परिणाम झाला आहे.२०२१ मध्ये जागतिक सरासरी आयुष्यमान कमी होऊन ते ७१ वर्षांवर आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top