आज मुंबईहून नागपूरसाठी एकेरी विशेष ट्रेन धावणार

मुंबई- उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर होत असलेली प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने उद्या गुरुवार २ मे रोजी मुंबई-नागपूर दरम्यान अतिजलद एकेरी ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेची गाडी क्रमांक ०२१०३ ही एकेरी विशेष ट्रेन २ मे रोजी रात्री १२.२२ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल.ही ट्रेन दुसर्‍या दिवशी दुपारी ३.३२ वाजता नागपूरला पोहोचेल.या ट्रेनला दादर,ठाणे,कल्याण , इगतपुरी,नाशिक रोड,मनमाड,भुसावळ, मलकापूर,शेगाव,अकोला,मूर्तीजापूर,बडनेरा,धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबे असणार आहेत. या ट्रेनमध्ये २ वातानुकूलित द्वितीयसह वातानुकूलित तृतीय,३ वातानुकूलित तृतीय,८ शयनयान आणि ६ सामान्य द्वितीय श्रेणी तसेच २ गार्ड ब्रेक व्हॅन असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top