आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोल्हापूर दौऱ्यावर

कोल्हापूर – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यावेळी त्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यासाठी शहरातील वाहतूकीत मोठ्या प्रमाणात बदल केले आहेत. त्याशिवाय राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आवाहन केल आहे की, देवीच्या दर्शनासाठी द्रौपदी मुर्मू या अंबाबाई मंदिरात येणार असल्याने भाविकांसाठी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मंदिरात दर्शन बंद राहणार आहे. त्यामुळे या वेळेत मंदिरात येणे टाळावे.