Home / News / आज शिंदखेड्यात बालाजी रथोत्सव ! उद्या पालखी उत्सव

आज शिंदखेड्यात बालाजी रथोत्सव ! उद्या पालखी उत्सव

धुळे- तब्बल १४७ वर्षांची परंपरा असलेला शिंदखेडा शहरातील रथोत्सव उद्या गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी तर पालखी उत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर...

By: netadmin
Social + WhatsApp CTA

धुळे- तब्बल १४७ वर्षांची परंपरा असलेला शिंदखेडा शहरातील रथोत्सव उद्या गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी तर पालखी उत्सव शुक्रवार १८ नोव्हेंबर रोजी धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे.त्यानिमित्त उद्या सकाळी सुदर्शन चक्र मिरवणूक तर दुपारी साडेबारा वाजता रथ मिरवणुकीला सुरुवात होईल.

बालाजी भगवान यांचा रथ २५ ते ३० फुट उंचीचा आहे.या रथाला पाच चाके आहेत. ही रथाची मिरवणुक शहरातील शनी गल्ली,गांधी चौक,देसाई गल्ली मार्गाने मार्गस्थ होऊन रात्री उशिरापर्यंत चालणार आहे. या उत्सवात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पंचमंडळ लक्ष ठेवून असणार आहे. शुक्रवारी बालाजी पालखी उत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी व्यंकटेशची मूर्ती विधिवत पूजा करून पालखीत ठेवली जाते. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता पालखी महोत्सवाला सुरुवात होते. रथ मार्गानेच ही पालखी नेण्यात येते. या पालखी महोत्सवात विविध वहन,आमची माती,आमची माणसं,पेरणी नृत्य पथक आदी आकर्षण असते. यावेळी भाविक आरती करून केळीचा नैवेद्य बालाजीला अर्पण करतात.

Web Title:
संबंधित बातम्या