आज सुट्टीच्या दिवशीही ‘राणी बाग’ सुरू राहणार

मुंबई – उद्या बुधवार १ मे रोजी कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. त्यामुळे भायखळा येथील राणी बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाला दर बुधवारी असणारी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. या दिवशी उद्यान जनतेकरिता खुले राहणार आहे; तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार २ मे हे उद्यान बंद असेल.

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते; मात्र महापालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्या दिवशी वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले असते व दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.त्यानुसार उद्या बुधवारी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. सुट्ट्यांचा काळ असल्याने यादरम्यान पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने उद्यान प्रशासनाने आवश्यक ती तयारी केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top