आठवीतल्या मुलीची लोकलखाली आत्महत्या

मुंबई – मुंबई महापालिकेच्या सीबीएसई शाळेतील आठवीच्या विद्यार्थिनीने धावत्या लोकलपुढे उभे राहून आत्महत्या केल्याची घटना मुलुंड स्थानकात घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
म्हाडा परिसरात राहणारी १३ वर्षांची ही मुलगी शुक्रवारी सायंकाळी क्लासला जाते म्हणून घरातून बाहेर पडली.पण ती थेट मुलुंड स्थानकातील चार नंबरच्या फलाटावर आली.त्याठिकाणी ती काहीवेळ विचार करत उभी राहिली.तेवढ्यात सीएसएमटीकडे जाणारी जलदगती लोकल स्थानकाकडे येत असल्याचे दिसताच ती पटरीत उतरून लोकलपुढे शांतपणे उभी राहिली.त्यानंतर काही क्षणात आलेल्या लोकलने तिच्या चिंधड्या उडाल्या. तिची बॅग सापडल्यानंतर रेल्वे पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना कळवून तिचा छिन्नविछिन्न मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला.तिचा घरात कुणाशीही वाद झाला नव्हता.पोलिस तिच्यावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर पुढील चौकशी करणार आहेत.रेल्वे स्थानकातील तिच्या सर्व हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top