आडगावचा प्रकल्प पळवला

नाशिक- शहरालगत आटी पार्क साकारण्यसाठी नाशिक महापालिकेत भाजपाची सत्ता असताना आडगाव जवळील तीनशे एकर जागेची निवड करण्यात आली आणि महापाालिकेला तोशीस लागू न देता तीनशे एकर क्षेत्रात पार्क साकारण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत आयटी समीटही झाली. मात्र, त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता होती. त्यामुळे हा प्रकल्प मागे पडलाच परंतु आता राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर हा प्रकल्प शिवसेनेच्या शिंदे गटाने राजूर बहुला येथे पळवला आहे. भाजपाकडून सातत्याने आडगाव जवळील आयटी पार्कसाठी पाठपुरावा केला जात असताना उद्योग मंत्रालयाने तो राजुर बहुला येथे मंजुर केला आहे. या ठिकाणी नियोजीत औद्योगिक वसाहत असून त्याठिकाणी हा शंभर एकरात हा पार्क व्हावा असे पत्र नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गेाडसे यांनी पत्र दिले हेाते. त्यानुसार उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हा विषय मंजुर केला असून भाजपात त्यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे आडगाव येथे हा प्रकल्प मंजूर व्हावा यासाठी भाजपाचे माजी महापौर सतीश कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन पाठपुरावा केला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top