आता वर्सोवा-दहिसर ३५ मिनिटांत कोस्टल रोड प्रकल्पाची उभारणी

मुंबई – मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी किनारी मार्गाचा म्हणजेच कोस्टल रोड मरीन ड्राइव्ह ते वरळी हा पहिला टप्पा जवळपास पूर्णत्वास आला आहे.आता वर्सोवा ते दहीसर या सुमारे १८.४७ किमीच्या ३५ हजार ९५५.०७ कोटींच्या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी पाच कंत्राटदारांची निवड करण्यात आली आहे. एकूण सहा पॅकेजमध्ये हे काम चालणार असून या प्रकल्पासाठी व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार आहे.या प्रकल्पामुळे वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाच्या वेळेत ३० ते ४० मिनिटांची बचत होईल.

पश्चिम द्रुतगती महामार्ग, लिंक रोड व एस. व्ही. रोडवरील वाहतूक कोंडी आणि वर्सोवा ते दहिसरमधील प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी पालिकेने वर्सोवा व दहिसरला जोडणाऱ्या किनारा रस्त्याच्या बांधकामाचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे.कोस्टल रोडच्या वर्सोवा आंतर-बदल ते दहिसर आंतर-बदल अशी या रस्त्याची रचना आहे. सोबत कोस्टल रोडच्या माईंडस्पेस मालाड जंक्शनपासून गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या गोरेगाव पूर्वपर्यंत उन्नत जोडरस्ता प्रस्तावित आहे.यामुळे, मुंबईचे दक्षिण टोक व पश्चिम उपनगरे, मुलुंड व ठाण्याशी जोडला जाणार आहे.

या प्रकल्पाचे काम डिझाइन अँड बिल्ड तत्त्वावर करण्यात येत आहे. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कमीत कमी खर्चात आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे पालिकेने म्हटले आहे.कांदळवने,खाडी यासारख्या विविध भूभागांतून तसेच मेट्रो कारशेडवरून जाणाऱ्या या प्रकल्पाची लांबी जास्त असून त्यात पूल, भुयारी मार्ग असणार आहेत.पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top