आदिवासींच्या संपामुळे नागालँडच्या सहा जिल्हयांत शून्य मतदानकोहिमा

नागालँडमध्ये काल मतदान झाले. मात्र पूर्व नागालँड भागातील जवळपास ४ लाख मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नाही.ईशान्येकडील नागालँड मधील नागालँड पिपल्स ऑर्गनायझेशनने गेल्या सात दिवसांपासून पुकारलेल्या बंदमुळे पूर्व नागालँडमधील सहा जिल्ह्यांमध्ये शून्य मतदान झाले.

सकाळी नेहमीप्रमाणे सात वाजता मतदानाला सुरुवात झाली मात्र संध्याकाळ पर्यंत या मतदान केंद्रांवर एकही मतदार आला नाही. मतदान कर्मचारी सर्व तयारीनिशी या बुथवर आले होते. मात्र मतदार फिरकले नाहीत. या काळात रस्त्यावरही वाहतूक दिसत नव्हती. या संदर्भात नागालँड पीपल्स ऑर्गनायझेशनवर कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आदिवासी संघटनेने वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी हा संप पुकारला आहे. यावेळी २० आमदारांनीही मतदान केले नाही.

दरम्यान, वेगळ्या नागालँड राज्याच्या मागणीबद्दल आपला काहीही आक्षेप नसून आपण त्याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे, असे नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top