आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवरील कचरा ‘शास्त्रोक्त’ प्रक्रियेतून उचलणार

  • ४५ मीटर रिंगरोडसाठी
    जागा उपलब्ध होणार

कल्याण- कल्याण पश्चिमेला आधारवाडी येथील डंपिंग ग्राऊंडवरील जुना कचरा आता बायोमायनिंग अर्थात शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून उचलला जाणार आहे.या ठिकाणी मे २०२१ पासून रोजचा कचरा टाकणे बंद केले आहे.पण जुन्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आता नेकॉफ इंडिया लिमिटेड कंपनीला कंत्राट दिले आहे.त्यामुळे आता याठिकाणचा कचरा कोणत्याही परिस्थितीत हटविला जाणार आहे.

हा कचरा हटवण्यासाठी स्वच्छ भारत अभियानांतर्गत ४२.४७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. गेल्या ४० वर्षांपासुन आधारवाडी डंपिंग ग्राऊंडवर कचरा टाकला जात होता. पण आता या कचर्‍यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून तो हटविला जाणार आहे.त्यासाठी आवश्यक मशिनरी,वे ब्रिज आणि कच्चा रस्ता तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. टप्पा क्रमांक १ च्या कामामधील कचरा हटवल्यानंतर ४५ मीटर रिंग रोडसाठी ३० टक्के जागा उपलब्ध होणार आहे. मात्र अजून प्रत्यक्ष प्रक्रिया करण्याचे काम सुरू झाले नसल्याने कुठल्याही प्रकारचा कचरा डंपिंग ग्राऊंड बाहेर पाठवलेला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top