“आप”ने चैत्रर वसावांना दिली भडोच लोकसभेची उमेदवारी

गांधीनगर – इंडिया आघाडीच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीत बिघाडी होण्याची चिन्हे आहे. इंडिया आघाडीत सहभागी असलेल्या आम आदमी पक्षाने उमेदवाराची घोषणा केली आहे. आमदार चैतर वसावा यांना भडोच लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली.

केजरीवाल तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान सभेतून केजरीवालांनी वासवा यांची उमेदवारी घोषणा केली. डेडियापाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार वसावा सध्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. वसावा यांच्या समर्थनार्थ जाहीर सभा घेण्यासाठी अरविंद केजरीवाल आले होते. केजरीवाल म्हणाले की, ‘हा लढा आदिवासी समाजाच्या सन्मानासाठी आहे. हा अपमान यापुढे सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आम्हाला भाजपाला द्यायचा आहे.` इंडिया आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असताना केजरीवालांनी मात्र आपला उमेदवार घोषित केल्याने उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top