आमच्या युवकांना सैन्यात घेऊ नका नेपाळ सरकारची रशियाला विनंती

काठमांडू – रशियाच्या सैन्यामध्ये नेपाळी नागरिकांना भरती करून घेऊ नये,तसेच युक्रेन विरुद्धच्या लढाईमध्ये लढण्यासाठी रशियाच्या सैन्यामध्ये यापूर्वीच दाखल झालेल्या नेपाळी युवकांना पुन्हा नेपाळला पाठवण्यात यावे, अशी विनंती नेपाळ सरकारने रशियाकडे केली आहे.

नेपाळमधील किमान २०० युवक बेकायदेशीर मार्गानी रशियाच्या सैन्यामध्ये दाखल झाले आहेत. त्यापैकी १२ जण युक्रेनविरुद्धच्या युद्धामध्ये मारले गेले आहेत. या अनुषंगाने नेपाळने रशियाला ही विनंती केली आहे.युगांडाची राजधानी कंपाला येथे आयोजित नॉन अलाइन्ड मुव्हमेंटच्या परिषदेच्या निमित्ताने नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन. पी. सौद यांनी रशियाचे परराष्ट्र राज्यमंत्री वेर्शिनिन सर्जी वासिलिएविच यांच्याकडे ही विनंती केली आहे.ज्या देशाबरोबर नेपाळचे पारंपारिक संबंध आहेत, असे देश वगळता अन्य कोणत्याही देशातील सैन्यामध्ये भरती करण्यासाठी आपल्या नागरिकांना पाठवण्याचे नेपाळ सरकारचे कोणतेही धोरण नाही.त्यामुळे रशियाने नेपाळी नागरिकांना रशियाच्या सैन्यामध्ये भरती करून घेऊ नये आणि यापूर्वी भरती झालेल्यांना परत पाठवावे.तसेच रशियाच्या बाजूने लढताना रशिया- युक्रेन युद्धात लढताना मारले गेलेल्या नेपाळी युवकांचे मृतदेह मायदेशी पाठवावेत आणि त्यांच्या कुटुंबाला भरपाई द्यावी अशी विनंती केल्याचे सौद यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top