आमदार संजय शिरसाटांनी राज ठाकरेंची भेट घेतली

मुंबई – संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज भेट घेतली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर ही भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या भेटीनंतर संजय शिरसाट यांनी सांगितले की, राज ठाकरेंना भेटायची, त्यांच्यासोबत गप्पा मारायची, फार दिवसांपासून इच्छा होती. त्यामुळे यात कोणत्याही राजकीय गप्पा झाल्या नाहीत. थोडीफार राजकीय चर्चा होत असते. जुन्या आठवणींना उजाळा देण्याचे काम आम्ही केले. राज ठाकरे हे वरिष्ठ नेते आहेत. ते महायुतीत येणार की नाही याबाबत बोलण्याचा आम्हाला काही अधिकार नाही. मात्र ते आले तर त्यांचे स्वागतच होईल. रेड कार्पेटवर त्यांचे स्वागत केले जाईल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्ताने त्यांची सभा आहे आणि या सभेच्या दिवशी राज ठाकरे महत्त्वाची घोषणा करू शकतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top