आयर्लंडला वादळाचा तडाखा १०० हून अधिक उड्डाणे रद्द

डब्लिन – उत्तर युरोपातील आयर्लंडला ‘ईशा ‘ वादळाचा मोठा तडाखा बसला.याठिकाणी ताशी ९० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहत होते.त्यामुळे त्याचा परिणाम विमान उड्डाणे आणि रेल्वेसेवेवर झाला.या वादळामुळे डब्लिन विमानतळावरील १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

पुढील काही तास या वादळी वार्‍याचा वेग ताशी १४५ किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असून त्यामुळे जिवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.डब्लिन विमानतळ प्राधिकरणाने तर आज २४ उड्डाणे रद्द करून २७ उड्डाणे इतर विमानतळाकडे वळवली ,अशी माहिती या विमानतळाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ दिली होती.एथबॉय,काऊंटी मीथ आणि आयर्लंडमध्ये ईशा वादळामुळे जोरदार पाऊस कोसळला.डब्लिन विमानतळ प्राधिकरणाने तर आपल्या प्रवाशांना नियोजित वेळेच्या तीन तास आधी पोहचण्याचे आवाहन केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top