Home / News / ‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

‘आरटीई’ अंतर्गत प्रवेशप्रक्रिया सुरू, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण अधिकारांतर्गत (RTE) दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवली जाती. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीई अंतर्गत प्रवेश...

By: E-Paper Navakal

कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शिक्षण अधिकारांतर्गत (RTE) दरवर्षी प्रवेश प्रक्रिया राबवली जाती. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीई अंतर्गत प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. दुर्बल वंचित घटकांतील बालकांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी शाळांमधील 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मुलांना इयत्ता आठवीपर्यंतचे शिक्षण मोफत शिक्षण असेल.

आरटीई (RTE 2025)  अंतर्गत आपल्या मुलांचे प्रवेश घेऊ इच्छिणारे पालक अधिकृत वेबसाइट student.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. राज्यभरातील 8,849 शाळांनी प्रवेश प्रक्रियेसाठी नोंदणी केली आहे, यामध्ये 1,08,961 जागा उपलब्ध आहेत. पुण्यात सर्वाधिक 951 शाळांनी नोंदणी केली असून, येथे 18,451 जागा उपलब्ध होणार आहेत.

अर्ज करण्याची तारीख

25 टक्के आरक्षित जागांसाठी शिक्षण अधिकारांतर्गत प्रवेश 14 जानेवारीपासून सुरू झाली असून याची अंतिम तारीख 27 जानेवारी 2025 आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया

पालक मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी student.maharashtra.gov.in या वेबसाइटवरून अर्ज करता येईल. पालकांना अर्ज  (RTE 2025)  करताना 10 शाळांची निवड करता येईल. अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन सोडत काढण्यात येईल. तसेच, ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी आहे, तेच मुलांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.

Web Title:
For more updates: , , stay tuned with Navakal
Topics:
संबंधित बातम्या