आरे कॉलनीत आढळली बिबट्याची तीन पिल्ले !

मुंबई – मुंबई उपनगरातील आरे कॉलनी परिसरात एका कोरड्या पाण्याच्या टाकीजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत. बेवारस स्थितीत आढळलेल्या या बिबट्याच्या या शावकांना तिच्या आईसोबत एकत्र आणण्यासाठी वनविभाग प्रयत्न करत आहे,अशी माहिती एका अधिकाऱ्याने काल बुधवारी दिली.

ही पिल्ले मंगळवारी सकाळी कोरड्या पाण्याच्या टाकीजवळ आढळून आल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती.हा परिसर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्याजवळ आहे. वन्यजीव कल्याणासाठी रेस्किंक असोसिएशनचे अध्यक्ष आणि मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांनी सांगितले की, शावकांना त्रास होऊ नये म्हणून वन आणि पोलिस कर्मचाऱ्यांनी परिसराची नाकेबंदी केली.वनविभाग आणि एसजीएनपीचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि पिल्लांना त्यांच्या आईसोबत परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली.घटनास्थळी कॅमेरा ट्रॅप आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून या पिल्लांवर लक्ष ठेवले जात असल्याचे वन अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top