आरोग्य विभागातील स्वच्छता कंत्राटदारांचा आंदोलनाचा इशारा

मुंबई

राज्य शासनाच्या आरोग्य विभागातील स्वच्छता कंत्राटदारांना आरोग्य विभागातील प्रशासन व सरकारच्या जाचक अटी- शर्ती मान्य नसल्याने त्यांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे. सरकारी रुग्णालये व स्वच्छता हे समीकरण फार महत्वाचे आहे. रुग्णालयात स्वच्छता नसल्यास रुग्णाचे आरोग्य अजून धोक्यात येऊ शकते. त्यामुळे स्वच्छता कंत्राटदार हे महत्वाची भूमिका बजावतात, मात्र आता या स्वच्छता कंत्राटदारांचा हक्क सरकारने हिरावून घेत त्यांना बेरोजगार करण्याचा डाव रचला आहे. त्यांचे काम काढून बड्या भांडवलदारांना देण्याचे षडयंत्र सरकारने सुरू केले आहे, असा आरोप स्वच्छता कंत्राटदार संघटनेने केला.

लाखो रुपयांचे कंत्राट घेणारे छोटे कंत्राटदार बाद करून करोडो रुपयांचे कंत्राट घेणारे बडे भांडवलदार सरकारला जवळचे वाटू लागले आहेत. असे चित्र नवीन निविदा प्रक्रियामधील जाचक अटी-शर्ती पाहून दिसत आहे. त्यामुळे या विरोधात संघटना आंदोलन व न्यायालयात जाणार असल्याची माहिती संघटनेचे पदाधिकारी सचिन मुळीक यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top