आर्टिफिशिअल इंटेलिजन्सवर निर्बंध अमेरिका सरकारचा मोठा निर्णय

वॉशिंग्टन :

आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणजेच एआय हे मानवाला मदत करण्यासाठी तयार करण्यात आले असले, तरी भविष्यात यामुळे आपल्याला धोका देखील निर्माण होऊ शकतो. आतापासूनच कित्येक क्षेत्रातील नोकऱ्या एआयमुळे धोक्यात आल्या आहेत. त्यामुळेच एआयवर निर्बंध लागू करण्यासाठी अमेरिका सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी काल एका एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली. यानुसार आता एआयवर निर्बंध लागू करण्याच्या दृष्टीने काही मापदंड तयार करण्यात येणार आहेत. यामध्ये लोकांची सुरक्षितता आणि गोपनीयता यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येईल. याविषयी बायडेन यांनी म्हटले की, “संपूर्ण जगात एआय सुरक्षेबाबत कोणत्याही देशाने केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. येत्या ५ ते १० वर्षांमध्ये तंत्रज्ञानात एवढे बदल होतील, जे आपण गेल्या ५० वर्षांमध्ये देखील पाहिले नाहीत. आपण सर्व बाजूंनी तंत्रज्ञानाने वेढलेलो आहोत. एआय देखील प्रचंड वेगाने प्रगती करत आहे. यामुळे मोठ्या संधी उपलब्ध होत असल्या, तरी सोबतच याचे बरेच धोके देखील आहेत.”

बायडेन यांनी दिलेल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डरनंतर आता एआय डेव्हलपर्सना आपल्या एआयचे सर्व सुरक्षा चाचण्यांचे निकाल फेडरल गव्हर्नमेंटला द्यावे लागतील. हा नियम डिफेन्स प्रोटेक्शन कायद्याप्रमाणेच असेल. शिवाय अमेरिका प्रशासन बायोलॉजिकल सिंथेसिस स्क्रीनिंगसाठी काही नियमावली तयार करेल. एआयने स्वतःच एखादे बायोलॉजिकल मटेरिअल तयार करू नये, हा यामागचा उद्देश्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top