आळंदीला पायी जाणाऱ्या दिंडीत कंटेनर शिरला

४ वारकऱ्यांचा मृत्यू, ८ जखमी

अहमदनगर

नाशिक – पुणे महामार्गावर शिर्डीहून आळंदीला पायी जाणाऱ्या दिंडीत कंटेनर शिरला. या भीषण अपघातात ४ वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर ८ जण गंभीर जखमी झाले. शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. यावेळी कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बाळासाहेब अर्जुन गवळी, बबन पाटीलबा थोरे, भाऊसाहेब नाथा जपे, ताराबाई गंगाधर गमे अशी मृतांची नावे आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतकार्य सुरु केले. त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली. वारकऱ्यांचा असा अपघाती मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. बिजलाबाई शिरोळे, राजेंद्र कारभारी सरोरे, भाऊसाहेब दशरथ गायकवाड, ओंकार नवनाथ चव्हाण, निवृत्ती पुंजा डोगरे, शरद सचिन चापके, अंकुश ज्ञानेश्वर कराळ, मिराबाई मारुती ढमाले अशी जखमींची नावे आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top