आ. शशिकांत शिंदेंसह ७ जणांवर गुन्हा दाखल

नवी मुंबई – नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामगार संचालक आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह ७ आजी-माजी अधिकाऱ्यांविरोधात आज संध्याकाळी एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.बाजार समितीच्या विविध बाजारपेठांमधील सार्वजनिक शौचालयांचे मर्जीतील संस्थांना वाटप करून बाजार समितीचे ७ कोटी ६१ लाख ४९ हजार ६८९ रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला होता. त्यानंतर शशिकांत शिंदेंसह बाजार समितीचे तत्कालीन उपसचिव रवींद्र आनंदराव पाटील, जी. एम. वाकडे, सीताराम कावरखे, विद्यमान उपसचिव विजय पद्ममाकर शिंगाडे, उपअभियंता सुदर्शन भोजनकर, कनिष्ठ अभियंता राजेंद्र पांडुरंग झुंजारराव आणि कार्यालयीन अधीक्षक विलास पांडुरंग पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top