इंग्लडच्या स्थानिक निवडणूकांमध्ये ऋषी सुनकांचा पक्ष पिछाडीवर

लंडन
इंग्लडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचा हुजुर पक्ष इंग्लडमधील स्थानिक निवडणुकांमध्ये पिछाडीवर गेला आहे. त्यामुळे आता पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा अशी मागणी मजूर पक्षाने केली आहे. हुजूर पक्षाने लढवलेल्या जागांपैकी अर्ध्या जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. मजूर पक्ष गेल्या दहा वर्षांमध्ये न मिळवलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजयी झाले आहेत. मजूर पक्षाचे नेते किर स्टिमर यांनी हा पराभव म्हणजे ऋषी सुनक यांना दिलेला थेट इशाराच असल्याचे म्हटले आहे.

इंग्लडमध्ये पुढच्या वर्षी २८ जानेवारीपूर्वी सार्वत्रिक निवडणूक घेणे आवश्यक आहे. सार्वत्रिक निवडणुकीची तारीख ठरवण्याची जबाबदारी ऋषी सुनक यांच्यावर आहे. त्यामुळे ते लवकर निवडणूक घोषित करतात का याकडे लक्ष असल्याचे मजुर पक्षाने म्हटले आहे. केंद्रीय मतदानाच्या टक्केवारीचा विचार केला तरी मजुर पक्षाकडे २० टक्के अधिक मते आहेत, असेही पक्षाच्या नेत्यांनी म्हटले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे पूर्ण निकाल उद्यापर्यंत येण्याची शक्यता असून त्यानंतर लंडनच्या महापौरपदाचीही निवडणूक होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top