इंडियन मिलिटरी कॉलेजची पात्रता परीक्षा आता ८ जूनला

पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडूनची (आरआयएमसी) प्रवेश पात्रता परीक्षा आता ८ जून रोजी घेण्यात येणार आहे.
आरआयएमसी डेहराडूनमध्ये इयत्ता आठवीसाठी ही प्रवेश पात्रता परीक्षा आहे.ही परीक्षा १ जून रोजी होईल असे याआधी जाहीर करण्यात आले होते. मात्र आता वेळापत्रकात बदल करून ही परीक्षा ८ जून रोजी घेण्यात येणार आहे.
१ जून रोजी देशातील आठ राज्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.त्यामुळे ही परीक्षा १ जून ऐवजी ८ जून रोजी घेण्यात येईल, असे आरआयएमसी कमांडंटनी जाहीर केले आहे.याबाबत अधिक माहितीसाठी www.rimc.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top