इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक! २४ तासांत पाच स्फोट

जकार्ता

इंडोनेशियाच्या रुआंग पर्वतावर कालपासून सातत्याने ज्वालामुखीचा उद्रेक होत आहे. येथे गेल्या २४ तासांत पाच स्फोट झाले. त्यामुळे इंडोनेशियातील सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून ११,००० हून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवले आहे. सातत्याने होणाऱ्या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे लाव्हा हजारो फूट उंच उडून सर्वत्र राख पसरली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी त्सुनामीचा इशारा दिला आहे. ज्वालामुखीचा ढिगारा समुद्रात पडण्याची भीतीही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. रुआंग माउंटनवर मंगळवारी ९.४५ वाजता पहिला स्फोट झाला. पहिल्या स्फोटातून राखेचा ढग २ किलोमीटरपर्यंत पसरला. याशिवाय रतुलांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व उड्डाणे विमानतळ प्राधिकरणाने रद्द केली आहेत. या विमानतळावरून चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या उड्डाणांवर परिणाम झाला आहे. ज्वालामुखीचा प्रभाव शेजारील मलेशियामध्येही झाला आहे. मलेशियातील किनबालु आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक विमानांचे उड्डाण उशिराने होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top