इंदुरीकर महाराजांच्या घरात शिरला बिबट्या

अहमदनगर- कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या अनोख्या कीर्तनाच्या शैलीमुळे नेहमी चर्चेत असतात.याच इंदुरीकर महाराजांच्या राहत्या घरात बिबट्या शिरला.या बिबट्याने महाराजांच्या घराबाहेरील शेडमध्ये असलेल्या एका कुत्र्याला शिकार बनवले. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचे दृश्य कैद झाले आहेत.या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

संगमनेर तालुक्यातील ओझर गावात कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचे घर आहे.महाराज यांच्या घरात बिबट्या घुसला.सीसीटीव्ही फुटेजमध्ये बिबट्या कैद झाला आहे.शेडमध्ये असलेल्या एका कुत्र्याला बिबट्याने उचलून नेले. या व्हिडीओमध्ये दोन कुत्रे झोपलेले दिसत आहेत. तेवढ्यात तिथे अचानक बिबट्या येतो,त्यापैकी एका कुत्र्यावर तो हल्ला करतो आणि त्याला आपल्या सोबत घेऊन त्या ठिकाणाहून पळ काढतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top