इंदूरमध्ये मतदान करणाऱ्यांना मोफत पोहे जिलेबी मिळणार

इंदूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केवळ निवडणूक आयोगच नाही, तर व्यापारी आणि जिल्हा प्रशासनानेही नवीन मोहीम सुरू केली आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. यावेळी मतदान करणाऱ्यांना तीन दिवस मोफत प्रवाससेवा देण्याचे आश्वासन येथील बसचालकांनी दिले आहे. याशिवाय टी-शर्ट आणि टोपीसाठी मतदान केंद्रांवर लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. तसेच मतदारांना शाईचे बोट दाखवल्यावर पोहे आणि जिलेबीचा नाश्ता मोफत देण्याची घोषणा इंदूरमधील व्यापारी संघटनांनी केली आहे.

दरम्यान, गुरुग्राममध्ये २५ मे रोजी मतदान होत असून गुरुग्राम जिल्हा प्रशासनाने मल्टिप्लेक्सच्या सहकार्याने प्रेक्षकांसाठी खास ऑफर ठेवली आहे. या अंतर्गत मतदारांना चित्रपटाची तिकिटे आणि सिनेमागृहात उपलब्ध असलेल्या खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top