इक्केडोरच्या ब्युटी क्वीनची रेस्टोरंटमध्ये गोळ्या झाडून हत्या

बाबाहोयो

इक्वेडोरची (द.अमेरिका) ब्युटी क्वीन आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर लँडी पॅरागा गोयबुरोची (२३) एका रेस्टॉरंटमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ती क्वेवेडो शहरातील एका रेस्टॉरंटमध्ये बसलेली दिसत आहे. यावेळी अचानक दोन सशस्त्र लोकांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. त्यात तिचा जागीच मृत्यू झाल्याचे दिसत आहे.

लँडी पॅरागा गोयबुरोची ती एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी शहरात आली होती. गोयाबुरोचे ड्रग स्मगलर लिआंद्रो नोरेरो याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जाते. त्याचा एक वर्षापूर्वी तुरुंगातील दंगलीत मृत्यू झाला होता. गोयबुरोचे नाव भ्रष्टाचाराच्या चौकशीतही आले होते. गोयबुरोने तिच्या हत्येपूर्वी रेस्टॉरंटमध्ये जेवतानाचा फोटो पोस्ट केला होता. या फोटोतील लोकेशन बघून तिला हल्लेखोरांनी गाठले आणि तिची हत्या केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top