इगतपुरीत बिबटयाचा हल्ला १० जण गंभीर जखमी

नाशिक

नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील उंबरकोन परिसरात एका बिबट्याने ११ वर्षांच्या मुलावर हल्ला केला. ही घटना काल सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर आज सकाळी वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पिंजरा लावण्यासाठी गेले असताना या बिबट्याने पाच ते सहा वनरक्षकांवर हल्ला केला.या परिसरातील तीन नागरिक असे जवळपास १० जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तात्काळ घोटी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top