Home / News / इचलकरंजीहून कोल्हापूर, मिरजसाठी रात्रीच्या वेळी एसटी फेर्‍या सुरू

इचलकरंजीहून कोल्हापूर, मिरजसाठी रात्रीच्या वेळी एसटी फेर्‍या सुरू

इचलकरंजी- नोकरदारांसह व्यापारी वर्गाने सातत्याने मागणी केल्यामुळे अखेर इचलकरंजीतून रात्री दहानंतर कोल्हापूर, सांगली आणि मिरज मार्गावर एसटी बसेसच्या फेर्या काल...

By: E-Paper Navakal

इचलकरंजी- नोकरदारांसह व्यापारी वर्गाने सातत्याने मागणी केल्यामुळे अखेर इचलकरंजीतून रात्री दहानंतर कोल्हापूर, सांगली आणि मिरज मार्गावर एसटी बसेसच्या फेर्या काल शुक्रवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

इचलकरंजी आगाराच्यावतीने काल शुक्रवारपासून इचलकरंजी-कोल्हापूर आणि इचलकरंजी-मिरज अशी एसटी फेरी सुरू करण्यात आली आहे. कोल्हापूरसाठी इचलकरंजी डेपोतून रात्री १०.३० वाजता शेवटची एसटी सुटणार आहे.ती कोल्हापूरहून त्याच रात्री ११.४५ वाजता परतीच्या प्रवासासाठी सुटेल.तर इचलकरंजीतून मिरजला सांगलीमार्गे जाणारी एसटी ९ वाजता सुटेल.ती त्याचमार्गे मिरजहून रात्री १०.३० वाजता निघेल,असे इचलकरंजी आगाराच्या वतीने सांगण्यात आले.या फेऱ्या सुरू केल्यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

Web Title:
संबंधित बातम्या