इन्फोसिस कंपनीचा लाभांश जाहीर! सूनक पती-पत्नीच्या संपत्तीत वाढ

नवी दिल्ली : आयटी कंपनी इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत ६२१२ कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ३टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे आयटी कंपनीने इन्फोसिसने १८ रुपयांचा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. कंपनीच्या लाभांशाच्या घोषणेनंतर, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती यांच्या संपत्तीत २०२३ मध्ये सुमारे १३८ कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.

अक्षता मूर्ती या नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची मुलगी. त्यांचे लग्न ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी झाले आहे. इन्फोसिसमध्ये मोठी भागीदारी असल्यामुळे, कंपनी जेव्हा लाभांश जारी करते तेव्हा त्यांच्या संपत्तीत वाढ होते. ऋषी सुनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती या इन्फोसिसमधील मोठ्या भागीदार आहेत. ऋषी सुनक यांच्याकडे इन्फोसिसचे ३,८९,५७,०९६ शेअर्स आहेत. हा कंपनीचा १.०५ टक्के हिस्सा आहे. अशा परिस्थितीत १८ रुपये प्रति शेअर लाभांशावर त्यांची संपत्ती ७० कोटी रुपयांनी वाढली आहे. हा लाभांश ६ नोव्हेंबर रोजी दिला जाणार असल्याचे इन्फोसिसकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top