इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह कमेंटमुळे मलकापूरमध्ये तणावाचे वातावरण

बुलढाणा- बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये इन्स्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याप्रकरणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तरूणाच्या या आक्षेपार्ह कमेंटविरोधात हजारो नागरिक रात्री रस्त्यावर उतरले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर काही वेळाने नागरिकांचा हा जमाव पोलीस ठाण्यावर धडकला. या घटनेनंतर पोलिसांनी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला.
इन्स्टाग्रामवरील पोस्टवर एका तरुणाने आक्षेपार्ह कमेंट केल्याने मलकापूरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या विरोधात काल रात्री मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. नागरिकांचा हा जमाव मलकापूर पोलीस ठाण्यावर धडकला. या घटनेनंतर पोलिसांनी ३०० ते ३५० जणांवर गुन्हा दाखल केला. मलकापूर पोलीस ठाण्याच्या आवरात अवैधरीत्या घुसून धार्मिक घोषणाबाजी व शहरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. या घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक मलकापूर येथे दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याविरोधात तत्काळ गुन्हादेखील नोंदवण्यात आला. या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका, असे अवाहन पोलिसांकडून केले आहे. तसेच कोणीही अफवा पसरवत असल्यास याची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात यावी आणि अफवा पसरवणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्याचा इशार देखील पोलिसांनी दिला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top