इम्रान खान यांना तुरुंगातच बैठका घेण्याची परवानगी!

इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि तहरीक-ए-इन्साफ म्हणजेच पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांना इस्लामाबाद
उच्च न्यायालयाने मोठा दिलासा देत तुरुंगातच निवडणुकीची रणनीती बनवण्याची परवानगी दिली आहे. खान यांना मिळालेल्या परवानगीमुळे त्यांच्या पक्षाचे नेते आणि वकील तुरुंगातच निवडणूक संदर्भात बैठक,सभा घेऊ शकणार आहेत.

इम्रान खान हे ५ ऑगस्टपासून रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात बंद आहेत.तोशाखाना प्रकरणात दोषी ठरल्यानंतर इम्रान खान यांना अटक करून तुरुंगात ठेवण्यात आले होते.मात्र, नंतर इस्लामाबाद उच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली.यानंतर त्यांना सायफर प्रकरणात अटक करण्यात आली.तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.

इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती मियांगुल हसन औरंगजेब यांनी हा निकाल दिला आहे. याचिकेत इम्रान खान यांनी पीटीआय पक्षाचे सदस्य असद कैसर, जुनैद अकबर खान, सिनेटर औरंगजेब खान आणि इश्तियाक मेहरबान यांच्यासोबत बैठक घेण्याची परवानगी मागितली होती.जेणेकरून आगामी निवडणुकीसाठी रणनीती बनवता येईल.न्यायालयाने त्यांना आता परवानगी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top