इराणच्या ताब्यातून पाच भारतीय खलाशांची सुटका

नवी दिल्ली –

इराणच्या ताब्यात असलेल्या ५ भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली आहे. १३ एप्रिल रोजी इराणने इस्रायलचे मालवाहू जहाज पकडले होते. या जहाजात १७ भारतीय खलाशी अडकले होते. त्यांची सुटका करण्यासाठी भारताचे प्रयत्न सुरू होते. अखेर भारताची परराष्ट्र धोरण कूटनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबत इराणसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर इराणने ५ खलाशांची सुटका करण्यास तयारी दर्शवली. हे पाचही खलाशी आज संध्याकाळी भारतात आले. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात माहिती दिली आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने याबद्दल इराण सरकारचे आभार मानले आहेत. १३ एप्रिल रोजी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलाने होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ इस्रायलच्या मालकीचे एमएसएसी एरीज हे जहाज ताब्यात घेतले होते. हे जहाज होर्मुझच्या सामुद्रधुनीतून दुबईच्या दिशेने जात होते. हे जहाज आपल्या हद्दीतून परवानगीशिवाय जात असल्याचा आरोप इराणने केला होता. जहाजावरील भारतीय क्रूमध्ये केरळमधील महिला खलाशी, ॲन टेसा जोसेफ यादेखील होत्या. त्यांची याआधीच इराण सरकारने सुटका केली होती. १८ एप्रिल रोजी त्या भारतात आल्या होत्या. आता पुन्हा इराणने ५ भारतीय खलाशांची सुटका करण्यास तयारी दर्शवली आहे. मात्र अजूनही ११ भारतीय खलाशी इराणच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारताचे प्रयत्न सुरू आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top