इराणच्या सीमाभागात ९ पाकिस्तानी मजुरांची हत्या

तेहरान –
पाकिस्तानला लागून असलेल्या इराणच्या दक्षिण-पूर्व सीमा भागात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी काल नऊ जणांची गोळ्या झाडून हत्या केली. हे सर्व जण पाकिस्तानी मजूर होते. इराणमधील पाकिस्तानच्या राजदूताने या घटनेला दुजोरा दिला आहे. गोळीबारानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या तीन बंदूकधाऱ्यांचा पोलीस शोध घेत असल्याचे इराणी मीडियाने म्हटले आहे.

या घटनेबाबत पाकिस्तानचे राजदूत मुहम्मद मुदस्सीर टिपू यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून अशी माहिती दिली आहे की, सारवान भागात ९ पाकिस्तानींच्या हत्येमुळे मोठा धक्का बसला आहे. दूतावास त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. आम्ही इराणला या प्रकरणी पूर्ण सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
या हत्याकांडाची जबाबदारी कोणत्याही व्यक्ती किंवा गटाने स्वीकारलेली नाही. तर बलुच हक्क गट हलवॉशने आपल्या वेबसाइटवर सांगितले की, मृत पाकिस्तानी मजूर ऑटो दुरुस्तीच्या दुकानात काम करत होते आणि तिथेच राहत होते. या घटनेत अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top