इराणच्या ‘सोराया ‘ उपग्रहाचे सर्वोच्च कक्षेत यशस्वी प्रक्षेपण

तेहरान – इराणने काल एका
‘सोराया ‘नावाच्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले.अवकाशातील आतापर्यंतच्या सर्वात उंचीवरच्या पातळीवर हा उपग्रह स्थापित करण्यात आला आहे.इराणने केलेल्या या उपग्रह प्रक्षेपणामुळे इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाबद्दल जगाला वाटणारी चिंता अधिकच वाढली आहे.

इस्रायल आणि हमासमधील युद्धाचा परिणाम म्हणून मध्यपूर्वेत तणाव निर्माण झाला आहे. त्यातच इराणने अलिकडेच पाकिस्तान, सीरिया आणि इराकमध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केला होता,विशेषतः पाकिस्तानमध्ये केलेल्या मार्‍यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभुमीवर इराणने या उपग्रहाचे प्रक्षेपण केले आहे.

इराणने अण्वस्त्रे वाहून नेऊ शकणार्‍या या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर संयुक्त राष्ट्राने बंदी घातली आहे.त्यामुळे इराणकडून उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाणे हे संयुक्त राष्ट्राच्या निर्बंधांचे उल्लंघन असेल,असे अमेरिकेने पूर्वी म्हटले होते.मात्र आपण अण्वस्त्रे निर्मिती करत नसल्याचे इराणने म्हटले आहे.अवकाश कार्यक्रम आणि अणूउर्जा कार्यक्रम हा केवळ नागरी हेतूसाठी आहे, असेही इराणने म्हटले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून इराणने अण्वस्त्रांच्या निर्मितीला आवश्यक तेवढे युरेनियम जमा केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top