इशा देओल लवकरच राजकारण प्रवेश करणार

मुंबई
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांची मोठी मुलगी इशा देओल ही राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पुढील काही वर्षात ती राजकारणात येण्याची शक्यता आहे असे हेमामालिनी यांनी म्हटले आहे.
इशा देओलचा कल राजकारणाकडे असून ती नक्कीच राजकारणात येणार आहे. असेही हेमामालिनी यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की राजकारण हा तिचाही आवडता विषय असून त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये ती राजकारणात प्रवेश करु शकते. येणाऱ्या वर्षांमध्ये ती राजकारणात चांगल्या प्रकारे सक्रिय असेल. तिच्या राजकारण प्रवेशानंतर ती आपल्या आईची जागा घेईल का याचीही चाचपणी सुरु असल्याचेही वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच इशा देओल हिने आपले पती व्यावसायिक भारत तख्तानी यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. तब्बल अकरा वर्षाच्या संसारानंतर ते विभक्त झाले आहेत. इशा देओलचे वडिल धर्मेंद्र, आई हेमामालिनी व भाऊ सनी देओलही राजकारणात आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top