इस्रायलच्या हल्यानंतर हमासचा गाझापट्टीत अंदाधुंद गोळीबार

नऊ सैनिकांचा मृत्यू

जेरुसलेम :

इस्रायली सैनिकांनी आठवडाभरापूर्वी हवाई हल्ला करत हमासवर स्फोटकांचा वर्षाव केला होता. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हमासने गाझापट्टीत १० इस्रायली सैनिकांना गाठले. हमासने त्यांच्यावर जोरदार गोळीबार आणि स्फोटकांचा वापर केला. यात इस्रायलच्या ९ सैनिकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर एक सैनिक गंभीर जखमी झाला आहे.

युद्धादरम्यान, ४ सहकारी सैनिकांशी संपर्क तुटल्यानंतर, त्यांना शोधण्यासाठी १० इस्रायली सैनिक निघाले होते. यावेळी गाझापट्टीत हमासच्या सैनिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात ज्यामध्ये ९ सैनिक जागीच ठार झाले. मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांमध्ये एका अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत ११५ इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाला आहे. ऑक्टोबर महिन्यात दहशतवादी संघटना हमासने अचानक इस्रायलच्या सीमावर्ती भागात हल्ले केले होते. या हल्ल्यात १२०० इस्रायली लोकांचा मृत्यू झाला होता. हमासच्या हल्ल्याला इस्रायलने देखील जोरदार प्रत्युत्तर देत गाझापट्टीत स्फोटकांचा वर्षाव केला. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत १८ हजारांहून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तेव्हापासून दोन्ही देशामध्ये भीषण युद्ध सुरू आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top