इस्रायल-हमासमधील युद्धामुळेकच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या

नवी दिल्ली – गेल्या आठवड्याच्या शेवटी जगाला आणखी एका युद्धाचा सामना करावा लागला.पूर्व युरोपमध्ये दीड वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धानंतर आता पश्चिम आशियामध्ये नवे युद्ध सुरू झाले आहे.पश्चिम आशियात निर्माण झालेल्या या तणावामुळे सोमवारी कच्च्या तेलाच्या किमती एका झटक्यात ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत.इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या.

पश्‍चिम आशियाचा प्रदेश संपूर्ण जगासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण जगाच्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांश गरजेचा पुरवठा याच भागातून केला जातो.हमासने शनिवारी सकाळी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील परिस्थिती पुन्हा अस्थिर झाली आहे. इस्रायलवर हमासने केलेला हल्ला गेल्या ५० वर्षांतील इस्रायलच्या इतिहासातील सर्वात भयंकर हल्ला असल्याचे विश्लेषक मानत आहेत. दरम्यान,भारताचे तेल मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितले की,तेलाची दरवाढ भारतासाठी चिंताजनक आहे.तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति पिंपापेक्षा अधिक असता कामा नये. तेलाच्या किंमती वाढल्या तर महागाई वाढेल आणि पुन्हा २००८ सारखी परिस्थिती निर्माण होईल.सध्या कच्च्या तेलाच्या किमतीत ५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top